रोहित जाधव : इचलकरंजी विशेष प्रतिनिधी
माळवाडी बोरगाव जि.सोलापूर येथे मनुवादी प्रवृत्तीने मातंग समाजाचे प्रेत जाळण्यास नकार दिल्याने त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे.याच पार्श्वभूमीवर या दुर्देवी व निंदनीय घटनेचा निषेध व विरोध करण्यासाठी यड्राव येथील समस्त मातंग समाजाच्या वतीने इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालय अधिकारी मा. विजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
मयत धनंजय साठे हे माळवाडी बोरगाव तालुका माळशिरस जि. सोलापूर असून त्यांचे बंधू हे त्या गावचे सरपंच पदावर आहेत.जातीवादी गावगुंडांनी हा मनात राग धरून साठे यांचे प्रेत स्मशानभूमीत जाण्यास नकार दिला व मातंग समाजाला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली महिलांनाही मारहाण, जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली त्या स्थितीमध्ये पोलीस प्रशासनही तिथेच उभी असून बघ्याची भूमिका घेऊन त्या गावगुंडांना साथ दिली.
सदर जातीवादी गावगुंडांचा व सदर पोलीस ठाण्याचा जाहीर निषेध करण्यात आला. तात्काळ संबंधित गुन्हेगार वृत्तीच्या जातीवादी समाजकंटकांवर गुन्हे दाखल व्हावेत व संबंधित पोलिस अधिकारी यांच्यावर ही गुन्हे दाखल व्हावे 7 दिवसात कार्यवाही न झाल्यास बोंब ठोक आंदोलनाचा इशारा देण्यात आला असे निवेदनात नमूद करण्यात आले.
शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे सचिव शशिकांत घाटगे, यड्राव येथील मिथुन बिरंजे, नितीन हेगडे, पत्रकार उत्तम जगताप, सचिन आदमाने,सागर वाघमारे, सुभाष कसबे, शकेल भडकवाड,सुरज चव्हाण, सागर नेटके, आकाश कसबे, बाळासाहेब आदमाने,इचलकरंजी व यड्राव येथील समस्त मातंग समाज बंधू व इतर घटक उपस्थित होते.
या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा