सांगली प्रतिनिधी - रोहित जाधव
सांगली : कोरोना लसीकरण सर्वत्र होत असून विविध ठिकाणी खासगी आणि शासकीय आरोग्य केंद्रात लस घेण्यास नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.सांगलीमध्ये विजय कॉलनी येथील आरोग्य केंद्र 5 मध्ये लस उपलब्ध असल्यामुळे नागरिक येथे आहेत,18 ते 44 वयो गटातील नागरिकासाठी येथे लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
सांगली बरोबर कोल्हापूर जिल्हा मधून ही लोक या आरोग्य केंद्रात ऑनलाईन लस नोंद करून पाहिला डोस घेण्यासाठी येत आहेत.रोजचे 500 डोस येथे उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना याचा फायदा होत आहे,गरोदर महिला, बेड पेशंट तसेच दीव्यांग,वयस्कर व्यक्तींना येथे खास लस देण्याची तात्काळ सोय करण्यात आलेली आहे,त्याच बरोबर येथे आर.टी.पी.सी.आर आणि अँटीजेन टेस्ट रोज घेतले जातात,नागरिकांची योग्य ती काळजी घेवून येथे फ्री मध्ये कोरोना लसीकरण केले जात आहे,अशी माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अलका तोडकर यांनी दिली आहे,त्याच बरोबर या आरोग्य केंद्रास वैधकिय अधिकारी, कोविड स्टाफ,माने नर्सिंग स्टाफ,आरोग्य अधिकारी डॉक्टर अंबोले, डॉ.वैभव पाटील, नोडल ऑफिसर,ANM कोलप मॅडम,स्वप्नाली सावलजकर,सुरेखा मानवर,राधिका बाजबालकर, मेघा पाटील,अंकुश घोडके,रोहित कांबळे,अनुराधा देसाई,मधुरा जोशी,अमर जाधव या सर्व डॉक्टर आणि नर्सेस,स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य व योगदान लाभत आहे,नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून या केंद्रात त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे.
या केंद्राने नागरिकासाठी केलेली सोय व नियोजन पाहाता सर्वत्र या केंद्राचे कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा