Breaking

शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

कराटे स्पर्धेत धरणगुत्ती शाळेतील इ.6 वी च्या तीन विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी



गणेश कुरले : धरणगुत्ती प्रतिनिधी


  धरणगुत्ती : यूथ गेम्स असोसिएशन महाराष्ट्रद्वारा आयोजित कराटे स्पर्धेत धरणगुत्तीच्या जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळेतील तीन विद्यार्थ्यांनीची सुवर्ण कामगिरी व एक विद्यार्थ्यानीने चंदेरी यश मिळवून शाळेबरोबर गावाचं नाव उज्वल केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे सन्मान व सत्कार कार्यसम्राट नेते शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

    कराटे या क्रीडा स्पर्धेतील उच्च कामगिरी करणारे आरती किरण लंगरे,अनुष्का अजित लंगरे,श्रवण कल्लाप्पा लंगरे याने प्रथम स्थान मिळवले व श्रावणी कल्लाप्पा लंगरे हिने द्वितीय स्थान पटकावले.

       त्यांच्या या कामगिरीने धरणगुत्ती मध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक यांनी केलेलं मार्गदर्शन व कष्ट या यशाच्या माध्यमातून फलित झाले आहे.

      या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा