Breaking

शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

"धरणगुत्तीच्या जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळेची कु.सानिका बिरू आरगे या विद्यार्थ्यांनीची एनएमसीएस परीक्षेत विजयी कामगिरी"



गणेश कुरले : धरणगुत्ती प्रतिनिधी


    धरणगुत्ती मधील जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळेचे विद्यार्थिनी कु.सानिका बिरू आरगे हिचे सुयश व ५ विद्यार्थी National Means-Cam-Merit Schoolorship (NMMS)  या परीक्षेत पात्र झाले आहेत. या विद्यार्थिनींचा यथोचित सत्कार कार्यशील नेते व सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

    कु.सानिका आरगे(41-NT-C-67 ) ही राज्यगुणवत्ता धारक विद्यार्थिनी 49 हजार रूपये शिष्यवृत्तीची मानकरी ठरली आहे.तसेच या परीक्षेतील पात्र विद्यार्थी शुभम गुंडा पाटील,कु. दिव्या सुरेश पाटील, संस्कार संजय स्वामी,कु. स्नेहा रामचंद्र लंगरे, निरजन सचिन माने व विजय मल्लिकार्जुन साखरे हे आहेत.

       शाळेच्या मुख्याध्यापक मा. सूर्यवंशी सर यांचे उत्तम नेतृत्व व कुशाग्र व प्रामाणिक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांना यश लाभले आहे.

      ग्रामीण भागातील या शाळेचं, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा