Breaking

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

तालिबानी प्रवक्त्याचं भारतासंबंधी महत्वाचं विधान. भारत - पाक संबंधावरही प्रतिक्रिया

 


     अफगाणिस्तानात तालिबाननं  देशाचा ताबा घेतल्यानंतर त्याचे भारतावर काय परिणाम होणार यासंबंधीचे प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यातच खुदद् तालिबानकडूनच या मुद्द्यावर पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 


     तालिबानच्या प्रवक्त्यानं भारतासोबत आम्ही चांगलं नातं प्रस्थापित करु इच्छितो असं म्हटलं आहे. शिवाय सर्व राजकीय नेतेमंडळी देशात सुरक्षित असून, त्यांना देश सोडून जाण्याची गरज नाही, असंही तो म्हणाला. 

भारत - पाकिस्तान...

      एकिकडे भारतासोबत चांगले नातेसंबंध प्रस्थापित करु पाहणाऱ्या तालिबाननं भारत आणि पाकिस्तान संघर्षाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर आपण हस्तक्षेप करु इच्छित नाही, कारण हा त्या दोन्ही राष्ट्रांमधील मुद्दा आहे. सध्या कोणालाही देश सोडण्याची गरज नाही. 


हेही वाचा...

तालिबानने कब्जा केलेल्या अफगाणिस्तानमधील क्रिकेट संघाचे काय होणार ?






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा