Breaking

बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

आता कोरोना लस बुक करा व्हॉट्सअँप वरून. अशा 👇🏼 पद्धतीने बुक करा लस.



मालोजीराव माने - कार्यकारी संपादक


     आता कोरोना ची लस मिळवण्यात जास्त अडचण होणार नाही,कारण लसीचा स्लॉट आता व्हॉटसअप वर आरक्षित (बुक) करता येणार आहे. तेही अगदी सोप्या पद्धतीने.


     व्हॉट्सअँप चे सीईओ विल कॅथकार्ट यांनी ट्विटर वरून जाहीर केलं की,  आम्ही आरोग्य मंत्रालय, भारत सरकार व MyGovIndia सोबत मिळून नागरिकांना कोरोना लस आरक्षित (बुक) करण्यात भागीदारी करत आहोत.





 व्हॉट्सअँप वर लस बुक करण्यासाठी या गोष्टी करा,

 *स्टेप 1 https://wa.me/919013151515  👈🏼 यावर  क्लिक करा.(जेणेकरून  'MyGov Corona Helpdesk' या नावाचे व्हॉटसअप उघडेल)

*स्टेप 2

यामध्ये तुम्हाला 'Book slot' असा मेसेज करायचा आहे. मेसेज केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी (OTP) येईल,तो तुम्हाला तिथे टाईप करायचा आहे.

    जर तुमचा मोबाईल (ज्यावर व्हॉटसअप अकाउंट आहे) नंबर कोविन (cowin) वर रजिस्टर नसेल. तर तो करावा लागेल असा मेसेज येईल, ज्यात दिलेल्या लिंकवरून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करू शकता.


*स्टेप 3

OTP टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती रजिस्टर केलेल्या व्यक्तींची नावे दाखवेल. तेव्हा तुम्हाला कोणाच्या नावाने लस बुक करायची आहे तो अनुक्रमांक मेसेज करावा.


*स्टेप 4

 यानंतर तुम्हाला हवी असलेली लस सिलेक्ट करायची आहे. ( कोविशिल्ड, कोव्यॅकसिन इत्यादी)


*लस 5

 यानंतर तुम्हाला लस फ्री किंवा पेड सिलेक्ट करावे लागेल.


*स्टेप 6

यानंतर तुम्हाला ज्या भागात लस हवी आहे तेथील पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर त्या भागातील उपलब्ध सेंटरची नावे दिसतील त्यातील तुमच्या सोईचे सेंटर निवडा. व लस बुक करा.


    व्हॉट्सअँप हे आज प्रसिद्ध समाजमाध्यम आहे, व यावरून आता कोरोना लसींचे स्लॉट बुक करणे तसेच लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवणे हे अत्यंत सोईस्कर होणार आहे. या उपक्रमात मदत करण्यासाठी MyGov चे सीईओ अभिषेक सिंग यांनी व्हॉटसअप चे आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा