प्रविणकुमार माने : उपसंपादक
जयसिंगपूर : दि.17/08/2021 रोजी 12.00 वा. ते दि. 24/08/2021 रोजी सकाळी 07.00 वा दरम्यानच्या मुदतीत जयसिंगपूर पोलीस ठाणे गु.र.नं.321/2021, भा.द.वि.स.कलम 454, 457 व 380 प्रमाणे दाखल (दाखल तारीख 24/08/2021) गुन्हयातील फिर्यादी विद्याधर नेमात्रा कांबळे, व.व.54, रा. गल्ली नं.8 राजीव गांधी नगर जयसिंगपुर, ता. शिरोळ यांच्या राहते घराच्या पाठीमागील बाजूने घराची कौले काढून घरात प्रवेश करून घरातील एकूण रु.12,500/- किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेलेबाबत मजकुराची फिर्याद दिलेली होती.
मा.पोलीस अधिक्षक सो. कोल्हापूर, मा.अपर पोलीस अधिक्षक सो गड विभाग तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, जयसिंगपूर श्री रामेश्वर वैंजने सो सदर गुन्हयाच्या तपासाचे अनुषंगाने दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे मा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे सो.तपासी अंमलदार सपोउपनि/कोरवी व जयसिंगपूर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार असे गुन्हयातील आरोपी व गेले मुद्देमालाचा शोध घेत असताना पो.कॉ.1333 डावाळे यांना गोपनिय बातमीदार यांचे कडून बातमी मिळाले प्रमाणे सदर गुन्हयातील आरोपी नामे संदेश अमृत निवडे, व.व. 19, रा. गल्ली नं. 8 राजीव गांधी नगर याने सदरचा गुन्हा केले असलेची खात्रीशिर माहिती मिळाल्याने त्यास राजीव गांधी नगर येथे सापळा रचून गुन्हेगारास ताब्यात घेऊन सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यानेच केल्याचे कबुल केला आहे.
सदर गुन्हयातील चोरुन घरी नेऊन ठेवलेला मुद्देमाल त्यात 1) रु.10,000/- किमतीचा स्पीडकॉन कंपनीचा एल ई डी, 2) रु.1500/- किमतीचा तांब्याचा हंडा, 3) रु.1000/- किमतीचा पितळेचा पिंप असा एकूण ₹.12500/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जयसिंगपूर उपविभाग उपअधीक्षक मा.रामेश्वर वैजने व मा.पोलीस निरीक्षक,मा. दत्तात्रय बोरीगिड्डे जयसिंगपूर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोउपनि/कोरवी, मपोहेकॉ/780 मुल्ला, पोना / 179 मगदुम, पोकॉ/1333 डावाळे, पोकॉ/2385 अवघडे, पोकॉ/843 पठाण, पोकॉ/2545 सुर्यवंशी व मपोकॉ/2351 चव्हाण यांनी केले आहे.
जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे जयसिंगपूरात चर्चा सुरू असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा