![]() |
पॅराऑलिम्पिक पटू दोन सुवर्णपदक विजेते देवेंद्र झाजरीया |
![]() |
निरज चोप्रा |
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये निरज चोप्राने भारतासाठी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकलं आणि सगळीकडे नीरज चोप्राच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला. एका रात्रीत पाच लाखाचे जवळपास 4 मिलियन फॉलोअर्स झाले. निरज चोप्राने 7 ऑगस्ट रोजी भालाफेक मधे सुवर्ण जिंकले म्हणून हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणूनही घोषित केला.
परंतु, भारतासाठी भालाफेक मधे सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला खेळाडू नाही. तर देवेंद्र झाझरिया हे आहेत पाहिले खेळाडू ज्यांनी पँराओलिम्पिक स्पर्धेत भालाफेक मधे भारताला एक नाही तर चक्क दोनवेळा सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
परंतु क्रिकेटवेड्या भारतातील बहुतांश जनतेला भारताने याआधीही भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे हे माहितीच नाही.
देवेंद्र झाझरियाने सर्वात प्रथम भालाफेकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याची किमया केली आहे. देवेंद्र झाझरियाच्या आधी कोणत्याही भारतीय खेळाडूने ही कामगिरी केली नव्हती. पण दुर्दैवाने त्याचं हे यश भारतीयांनी दुर्लक्षित केलं आणि साजरंही झालं नाही.
भारताच्या याच अनसंग हिरोबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
देवेंद्र झाजरिया हे एका हाताने अपंग आहेत. पण सामान्य लोकांसारखे आपण नसलो तरी किंवा त्यांच्यासारखे सर्व अवयव नसले तरीही त्याचे दु:ख करीत बसण्यापेक्षा आहे त्यामध्ये समाधान मानून मुलखावेगळी कामगिरी करणारे फारच थोडे असतात. राजस्थानमधील चुरू जिल्हय़ातील रहिवासी देवेंद्र झाझरिया हा अशाच मुलखावेगळय़ा खेळाडूंमध्ये मोडतो. झाडावर चढला असताना विजेच्या तारेचा धक्का त्याला बसला त्यामुळे त्यांचा डावा हात निकामी झाला.वयाच्या ८ व्या वर्षी त्यांना कृत्रिम हात बसवावा लागला.
देवेंद्र अन्य सामान्य मुलांबरोबरच शाळेत जात असे. तेथे त्याने फुटबॉलसह अनेक खेळांचा आनंद घेतला. तेव्हाच द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रिपुदमनसिंग यांनी देवेंद्रमधील नैपुण्य हेरले. या मुलामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची क्षमता आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये देवेंद्रला मैदानी स्पर्धामधील क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर गुरू-शिष्यांची ही जोडी झकास जमली.
अवघ्या पाच वर्षांच्या सरावानंतर देवेंद्र याने २००२ मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली. तेथून त्यांनी मागे पाहिलेलेच नाही.
💫२००४ मध्ये अथेन्स येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भालाफेकीत सुवर्णपदक पटकाविले.
💫पुन्हा त्यांनी २०१६ मध्ये रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली.
कोणत्याही भारतीय खेळाडूने ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदकं जिंकलेली नाहीत.
देवेंद्रचा हा रेकॉर्ड अद्यापपर्यंत कोणीही तोडू शकलेलं नाही.या दोन सुवर्णपदकांखेरीज त्याने अनेक आंतरराष्ट्रीय पदकांची लयलूट केली आहे, तसेच त्याने विश्वविक्रमांचीही नोंद केली आहे.
२००४ मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.२०१२मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पद्मश्री पुरस्कार मिळवणारे ते पहिले पॅरालिम्पियनपटू ठरले होते.
देशाच्या क्रीडा क्षेत्रातील राजीव गांधी खेलरत्न जो आता मेजर ध्यानचंद नावाने ओळखला जातो तो सर्वोच्च पुरस्कार त्यांना २०१७ मध्ये देण्यात आला. हा मान मिळविणारे ते पहिलेच दिव्यांग खेळाडू ठरले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा