Breaking

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

आता या वाहनांवरील रजिस्ट्रेशन व आर.सी(RC) शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र सरकार

 

संग्रहित

नवी दिल्ली: देशातील इंधनाच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी अधिकाअधिक प्रोत्साहन दिले जात आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने मंगळवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहनांवरील (Electric Vehicles) नोंदणी शुल्क (Registration Fee) माफ करण्यात आले आहे.(दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी सर्व गाड्यांचे) केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.





 यापूर्वी केंद्र सरकारने स्क्रॅपेज पॉलिसीतही इलेक्ट्रिक वाहनांना सूट देऊ केली होती. मात्र, आता इलेक्ट्रिक वाहनांवर नोंदणी शुल्क किंवा नुतनीकरणासाठी (RC) आकारले जाणारे शुल्कही माफ होणार आहे. त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले तर तुम्हाला त्यावर कोणतीही Registration Fee भरावी लागणार नाही. तसेच भविष्यात तुम्हाला RC साठीही पैसे भरावे लागणार नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा