शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी - रोहित जाधव
शिरोळ तालुक्यातील शिरटी-हसुर या गावामध्ये ५ फूट लांब व ३० किलो वजनाचे कासव सापडले असून हे कासव रेग्यूलर कासवापेक्षा फार मोठ असते.या कासवाला देवकासव असे म्हणतात. या गावातील सौरभ कांबळे यांच्या शेतामध्ये रात्रीच्या १०.३० वाजण्याच्या सुमारास हे एक मोठं कासव दिसून आले. त्यानंतर त्यांनी लगेच वाईल्ड लाईफ कंजर्वेशन रेस्क्यू सोसायटी जयसिंगपूर अर्थात WCRS या प्राणीमित्र टीमला फोन केला आणि लगेच त्यांनी फॉरेस्ट गार्डच्या मदतीने रेस्क्यू करून या कासवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात उदगाव येथील नदीपात्रात रात्रीच्या बाराच्या सुमारास सोडण्यात आले.
या वेळी WCRS अध्यक्ष अभिजित खामकर,शुभम रास्ते,दिलीप कांबळे, साई रसाळ,शाहरुख मुजावर,फॉरेस्ट गार्ड गजानन संकट यांनी मोलाची कामगिरी बजावली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा