प्रविणकुमार माने : उपसंपादक
कवठेसार ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथे एका तरूणाचा पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक व दुर्देवी घटना घडलेली आहे. तुकाराम आण्णा पाटील व.व 40 असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम आण्णा पाटील व. व 40 रा.1 ली गल्ली,कवठेसार, ता.शिरोळ जि कोल्हापूर यांचा तारीख 02/08/2021 रोजी सकाळी 10.10 वाजण्याच्या पूर्व कवठेसार येथील स्मशानभूमीलगत असले सरकारी विहीरीलगतच असलेल्या पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यू झाला आहे अशी वरदी मयताचे चुलत भाऊ संदिप सुभाष पाटील रा.एस.टी. स्टँडजवळ,कवठेसार ता.शिरोळ जि. कोल्हापूर यांनी पोलिस ठाण्यात येऊन दिलेली आहे. सदर वरदीदार यांचे वरदीनुसार पो.हे.काॅ.मांजरे साहेबांनी मयत दाखल केलेली आहे. सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास हा मा. पो.ना.सनदी साहेब करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा