तासगावच्या तहसिलदार कार्यालयातील सेवानिवृत्त लिपिक खंडू निकम मंगळवारी मध्यस्थाच्या माध्यमातून पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणात आता तहसिलदार कल्पना ढवळे सुध्दा लाचलुचपतच्या रडारवर आल्या असून त्यांची चौकशी करण्यात आली.
मंगळवारी रात्री तासगाव येथील शासकीय विश्रामगृहात त्यांची तासभर कसून चौकशी करण्यात आली होती. आज (बुधवारी) परत एकदा त्यांना सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
आज (बुधवारी) फेरचौकशी करुन त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे, अशी माहिती लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाडगे यांनी दिली आहे.
अशा लाचलुचपतीच्या घटनेमुळे लोकांचा रोष शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वाढताना दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा