कोल्हापूर महानगरपालिकेच्या डॉ. द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन हॉस्पिटलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन टँकचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन प्रतिदिनी 150 सिलींडर क्षमते इतक्या उत्पादनाचा ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आला आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून यासाठी सुमारे 80 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ज्या कोरोना रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता भासणार आहे. त्यांना या ऑक्सीजन प्लँटमुळे ऑक्सिजनची उपलब्धता होणार असल्याने रुग्णावर वेळीच उपचार करणे या प्लँटमुळे शक्य होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा