Breaking

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

*नाशिकच्या युवा अस्तित्व फाऊंडेशन महाराष्ट्र कडून शिरोळ तालुका पूरग्रस्तांना मदतीचा हात*

 


शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी - रोहित जाधव


     शिरोळ : सन २०२१ मध्ये अचानक पावसाने रौद्र रूप धारण करून सर्वत्र थैमान घातले परिणामी सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली.याचा सर्वात जास्त फटका कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यामधील अनेक गावांना बसला. अनेक गावे पाण्याखाली गेली आणि सर्वांचे अतोनात नुकसान झाले,ही परिस्थिती लक्षात घेता 'नाशिकच्या अस्तित्व फाऊंडेशन महाराष्ट्रने' शिरोळ तालुक्यातील मागास आणि अत्यंत बिकट परिस्थिती मध्ये असणाऱ्या डवरी समाजासाठी मदत केली. 

             काल नाशिकहून एक गाडी कुरुंदवाड या गावी आली व त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किट सर्वांना दिले. यामध्ये,तूरडाळ,बाजरी,गहू,साखर,चहा पावडर,बिस्कीट, टूथ ब्रश आदी वस्तूंचा समावेश होता.या फाउंडेशन ची स्थापना सन 2015 सली झाले  असून आता पर्यंत 18 पुरस्कार मिळालेले आहेत.त्याच बरोबर आमचे फाऊंडेशन सदैव समाज सेवेसाठी तत्पर असते असे फाऊंडेशन पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

      यावेळी फाऊंडेशनचे नाशिकचे पदाधिकारी मिनाथ लेवे,किरण पाटील संस्थापक अध्यक्ष,राहुल बच्छाव उपाध्यक्ष,रोहित कासार सचिव,सारंग जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले,

       इतक्या कठीण परिस्थितीमध्ये इतक्या लांबून शिरोळ तालुक्यासाठी मदत केल्याबद्दल फाऊंडेशनचे शेतकरी सहकारी बहुउद्दशीय संघ,कुरुंदवाडचे चेअरमन धनपाल दादू आलासे,अखिल भारतीय नाथ संघटना, नाथ युवा सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रोहित जाधव,  

पच्छिम महाराष्ट्र महिला संघटक श्रीमती भाग्यलता जाधव मॅडम,कोल्हापूर जिल्हा तालुका अध्यक्ष पंढरीनाथ हिंगमिरे, शिरोळ तालुका अध्यक्ष श्री, विकेश वाटकर यांनी आभार मानले.

1 टिप्पणी: