![]() |
Source-Lokmat |
ठाणे महापालिकेच्या माजीवडा प्रभागाच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. यामध्ये त्यांची तीन बोटं तुटली असून डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना या फेरीवाल्याने त्यांच्यावर धारधार शस्त्राने हा जीवघेणा हल्ला केला आहे.
![]() |
Source-tv 9 |
अमरजीत यादव असं या हल्लेखोराचं नाव आहे. या भागात परप्रांतीय भाजीवाल्यांचे अनधिकृत गाडे आहेत. कारवाई करत असताना या भाजीवाल्याचा गाडा जप्त केल्याने त्याचा राग अनावर झाल्याने त्याने हा हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
सध्या कल्पिता पिंपळे यांच्यावर ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांच्यासोबत असलेला अंगरक्षक देखील त्यांच्या मदतीला धावून आला होता, त्यामध्ये त्याचेही एक बोट तुटले आहे. त्याच्यावर देखील उपचार सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा