![]() |
डॉ.रोहित चव्हाण |
प्रा.चिदानंद अळोळी : विशेष प्रतिनिधी कुरुंदवाड
कुरुंदवाड येथील रोहित दिनकर चव्हाण या एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांने दक्षिण कोरिया सरकारचा 5 वर्षाचा संपूर्ण शैक्षणिक खर्च प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च मानली जाणारी पीएच.डी. ही पदवी Chemical Engineering या विषयात संपादन केली आहे.
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड या शहरातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले मात्र कुशाग्र बुद्धी व वैज्ञानिक जिज्ञासा अंगी बाळगलेला हा रोहित लहानपणा पासूनच खूप हुशार होता.अगदी शालेय जीवनापासून शिक्षण व कुटुंब या दोन्ही जबाबदारी पार पाडत त्याचा प्रवास सुरु असायचा, त्याचे प्राथमिक शिक्षण कुरुंदवाड येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत व माध्यमिक शिक्षण साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड आणि महाविद्यालयीन शिक्षण जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये रसायनशास्त्र विषया मधून पदवीचे शिक्षण(बी.एस्सी.) प्रथम क्रमांकाने पूर्ण केले.त्यानंतर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे पदव्युत्तर (एम.एस्सी.) चे शिक्षण हे तिसऱ्या क्रमांकाने पूर्ण केले.
रोहित चव्हाण यांच्या शैक्षणिक कामगिरीचा प्रवास इथपर्यंत थांबला नाही त्याने सोबतच देशातील व राज्यातील काही महत्त्वाच्या शैक्षणिक परीक्षा त्यापैकी NET-JRF (all india rank 17) GATE (all india rank 1875) परीक्षेत देशपातळीवर स्थान मिळविले.त्याच वर्षी महाराष्ट्र राज्याची SET परीक्षेत सुद्धा उत्तुंग असे यश मिळविले.
![]() |
डिग्री सर्टिफिकेट |
एकाच वर्षी या तिन्ह परीक्षा उत्तीर्ण होणारा शिरोळ तालुक्यातील पहिलाच विद्यार्थी आहे.शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर त्याला शिवाजी विद्यापीठा मधून दक्षिण कोरिया येथील चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी येथे पीएच.डी. साठी प्रवेश मिळवला व सोबतच फेलोशिप सुद्धा मिळवली आणि या विद्यार्थ्यांने Chemical Engineering या विषयातील "Perovskite solar cell" या शीर्षकाखाली आपला शोधनिबंध सादर करून पीएच.डी.प्राप्त केली. तसेच रोहितने सादर केलेले 10 शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियत कालिकामधून प्रसिद्ध झाले
![]() |
सर्टिफिकेट |
रोहित चव्हाण या विद्यार्थ्यांच्या या अतिउच्च कामगिरीचे कुरुंदवाड शहरासह शिरोळ तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा