Breaking

बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

*बळवंतराव झेले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल संघात निवड*



रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रतिनिधी


 दिनांक 30 ऑगस्ट 2021  रोजी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या बळवंतराव झेले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जयसिंगपूरचा विद्यार्थी  फजलेकरीम अब्दुलगणी गवंडी व अतुल सुभाष हाबळे या विद्यार्थ्यांची भारतीय थ्रोबॉल संघात निवड झाली. नुकत्याच जालंधर व पंजाब येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय थ्रो बाॅल स्पर्धेमध्ये सदरच्या दोन्ही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्णपदक पटकावले. तसेच पुढील महिन्यांमध्ये दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेमध्ये भारतीय संघात या दोन्ही खेळाडूंचे निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

     त्यांच्या या यशाबद्दल प्रशालेच्या वतीने मा.मुख्याध्यापक डी.पी.पाटील व उपमुख्याध्यापक  व्ही. ई. व्हावळ  यांच्या हस्ते क्रीडा दिनाचे औचित्य साधून हार व बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री राकेश पाटील व श्री सचिन हारोले  यांचा देखील गुलाब पुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला. प्रशालेचे चेअरमन मा. राजेंद्र झेले, सदस्य मा.दादा पाटील चिंचवाडकर,मा.आदित्यनाथ होस्कल्ले, मा. कुंभोजकर यांनी देखील सदरच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला उच्च माध्यमिक विभाग प्रमुख एस जी लोंढे , श्रीमती विमल धनपाल झेले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख प्राचार्य श्री एस.बी. चौगुले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ covid-19 नियमाचे पालन करून उपस्थित होते.

     या विद्यार्थ्यांच्या सुयशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा