अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य |
कागल - कोल्हापूर: कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक या ठिकाणी एका अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. सदर घटना हा खून नसून मुल व्हावे म्हणून संबंधित आरोपीने आपल्या मित्राच्या मुलाचा नरबळी दिला असल्याची अशी माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे. याविषयी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गृह उपअधीक्षक पद्मा कदम यांना भेटून निवेदन दिले. या घटनेविषयी माहिती देताना राजसरचिटणीस कृष्णात स्वाती म्हणाले, " महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर ही सुद्धा शाहूंच्या पुरोगामी विचारांची भूमी आहे असे म्हटले जाते. पण एकविसाव्या शतकात सुद्धा नरबळीची असे प्रकार होणे हे खूपच चिंतित करणारे आहे."
जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अरुण शिंदे यांनी अशा शोषण करणाऱ्या अघोरी आणि अमानुष प्रथांच्या आणि अंधश्रद्धांच्या विरोधात कायदा करण्यासाठी ज्यांनी अठरा वर्षे चिकाटीने प्रयत्न केले त्या शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी ही घटना उघड व्हावी ही अजून एक दुःखद बाब आहे.असल्याचे मत व्यक्त केले. तर जिल्हा प्रधान सचिव हर्षल जाधव यांनी शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र सरकारने 'जादूटोणा विरोधी कायदा' संमत केला आहे असे सांगून सावर्डे बुद्रुक येथील या घटनेचा सखोल तपास करून नरबळीच्या अनुषंगाने मिळत असलेल्या माहितीत सत्यता आढळल्यास या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित संशयित आरोपी आणि त्याला हा गुन्हा करण्यास उद्युक्त करणारा मांत्रिक यांची यांच्या विरोधात तात्काळ जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा. तसेच सदर प्रकरणी पुढील तपास करण्यासाठी स्वतंत्र एस.आय.टी. नेमण्यात यावी अशी मागणी केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी राजवैभव शोभा रामचंद्र, निशांत सुनंदा विश्वास, स्वाती कृष्णात उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा