Breaking

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

*कागलमध्ये अपत्य प्राप्तीसाठी डॉक्टर मित्राच्या मुलाचा गळा चिरून नरबळी*

 


हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी


कागल :- नरबळीपुरोगामी कोल्हापूर जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अपत्य प्राप्तीसाठी विकृत मित्रानेच आपल्या डॉक्टर मित्राच्या अवघ्या सात वर्षीय मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

ही भयंकर आणि अंगावर शहारे आणणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रकमध्ये घडली. वरद रवींद्र पाटील (वय ७, रा. सोनाळी, ता. कागल) असे या निष्पाप मुलाचे नाव आहे. या प्रकारानंतर सोनाळी गावात संतापाची लाट उसळली आहे.

       वरदच्या वडिलांच्या मित्रानेच अपत्यप्राप्तीसाठी बळी दिल्याचे समोर आले आहे. यानंतर सोनाळीमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, संशयित आरोपी मारुती तुकाराम वैद्य याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा