Breaking

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

*कोल्हापूर विमानतळाने दिले आंतरराष्ट्रीय मानाचे स्थान ; कोल्हापूरला ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ पुरस्कार जाहीर*

 


हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी


 कोल्हापूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार विमानतळावर कोरोना काळात प्रवाशांची सुरक्षा व योग्य काळजी घेतल्याबद्दल कोल्हापूर विमानतळाला लंडन येथील ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ या संस्थेने पुरस्कार जाहीर केला आहे. महाराष्ट्रात फक्‍त कोल्हापूरातील विमानतळाला हा बहुमान प्राप्त झाला आहे.

       कोरोना काळात विमानतळावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजना तसेच उपलब्ध करून दिलेल्या सुविधांच्या आधारे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या आंतरराष्ट्रीय संस्थेने सर्व विमानतळांची माहिती घेतली होती.2017 मध्ये या संस्थेची स्थापना झाली असून युरोप, उत्तर अमेरिका, कोरिया, दक्षिण अमेरिका, अफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेकडून कोल्हापूर विमानतळाची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

    कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळांच्या कर्मचार्‍यांनी कोरोना काळात प्रवाशांनी केलेल्या कामगिरीमुळे या पुरस्कारासाठी निवड झाली. यापुर्वीही केंद्र शासनाच्या जलशक्‍ती मंत्रालयाकडून विमानतळाला पाण्याची बचत करून बाग फुलविल्याबद्दल पुरस्कार प्राप्‍त झाला आहे.

1 टिप्पणी: