Breaking

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

स्पंदना स्फुर्ती कंपनीकडून कुरुंदवाड परिसरातील पूरग्रस्त महिलांना गृहउपयोगी साहित्याच्या माध्यमातून मदतीचा हात

 


सौंदर्य पोवार :  विशेष प्रतिनिधी


शिरोळ : महापुर २०२१मध्ये शिरोळ तालुक्यातील असंख्य गावे ही पूर बाधित होती. सर्वत्र आर्थिक नुकसानीमुळे हाहाकार माजला होता अशावेळी कुरूंदवाड व संपुर्ण परिसरात ही दु:खाचे सावट निर्माण झाले होते. त्या दु:खी कुटुंबांना मदतीचा हात पुढे करीत स्पंदना स्फुर्ती फायनांन्सियल लिमिटेड कंपनीने महिलांना गृहउपयोगी साहित्य देऊन मदतीचा हात दिला आहे.

      नेहमीच महिला सबलीकरणासाठी महिलांना घरबसल्या काम उपलब्ध करून देण्यासाठी  या कंपनीच्या माध्यमातून कमी कागदपत्रांमध्ये कर्जाची सोय केली जाते याचा फायदा शिरोळ तालुक्यातील बहुतांश महिलांनी घेतला आहे. परंतु कोरोना आणि महापुर या संकटात सापडलेल्या महिलांना मदतीचा हात देत या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. 

     या प्रसंगी प्रादेशिक व्यवस्थापक हेमनाथ साहु, विभागीय व्यवस्थापक रामकृष्ण शेळके, ब्रँच व्यवस्थापक अमोल मिलगणवार, अहमद शरिफमसलत अक्षय सर, पृथ्वीराज सर व तेरवाड, कुरूंदवाड परिसरातील महिला वर्ग उपस्थित होता.

  संकट काळात कंपनीने केलेल्या मदतीसाठी कुरुंदवाड परिसरातील महिलांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा