Breaking

बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

*औरवाडच्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी कु.पृथ्वी प्रताप गावडे याची इंडियन नेव्ही मध्ये निवड*

 


प्रा.चिदानंद अळोळी : विशेष प्रतिनिधी


     शिरोळ तालुका हा शेतीप्रधान असून शेतीत अभिनव उपक्रम राबवून येथील शेतकरी काबाड कष्ट करून शेती करतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे.  शेतकरी हा जगाचा पोशिंदा मात्र तो  पिढ्यानपिढ्या आर्थिक विवंचनेत आहे, कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी सरकार यामुळे तो दारिद्र्यात खितपत पडला आहे. शेतात राबून सुद्धा आपल्या पदरात काहीच पडत नाही ही खंत त्याच्या मनात नेहमीच असते. जे आपल्या नशिबात आले ते मुलाच्या नशिबात येऊ नये यासाठी म्हणून तो आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे आवर्जून लक्ष देत आहे.

     त्याला आता शिक्षणामध्ये आपल्या मुलाचे भवितव्य दिसत आहे, म्हणून आता शेतकऱ्याची मुलं सुद्धा मोठे अधिकारी, शिक्षक व वेगवेगळ्या क्षेत्रात आता आपले नशीब आजमावत आहेत. शेती मध्ये गुंतलेल्या शेतकऱ्यांची संख्या प्रचंड असून मात्र लोकसंख्यावाढीमुळे जमिनीचे तुकडीकरण होऊन पिकावू जमीन ही कमी होत चालली आहे म्हणुन शेतकऱ्यांची मुले ही नवनवीन क्षेत्र आज काबीज करत आहेत.

     औरवाड गावचा सुपुत्र कु. पृथ्वी प्रताप गावडे याची इंडियन नेव्ही मध्ये निवड झाली असून ग्रामीण भागातील मुले ही या क्षेत्रात आपला ठसा उमटू शकतात हे याच्या निवडीवरून लक्षात येते. पृथ्वीचे प्राथमिक शिक्षण खोतवाडी येथील अल्फोनसो शाळेत तर माध्यमिक शिक्षण साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड येथे पूर्ण झाले व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण तासगाव येथील सैनिक कॉलेजमध्ये त्यानंतरचे उच्च माध्यमिक शिक्षण हे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येते सुरु होते. B.Sc. च्या प्रथम वर्षात वडिलांचे छत्र हरवले  व कुटुंबावर खूप मोठं दुःख कोसळले त्यातून सावरत आपल्या कुटुंबाची जबाबदारी आता आपल्यावरच आहे म्हणून पूर्वीपेक्षा दुप्पट कष्टाने इंडियन नेव्हीसाठी  प्रयत्न सुरू केले. 2020 ला  B.Sc. च्या द्वितीय वर्षात असतानाच परीक्षा दिली व 2021 मध्ये निकाल लागला व या विद्यार्थ्यांची  इंडियन नेव्ही मध्ये निवड झाली ,यानंतर ओडिसा राज्यातील INS चिलखा येथे 6 महिन्याचे बेसिक ट्रेनिंग पूर्ण झाले आहे व  INS हमला येथिल 4 महिन्याचे ट्रेनिंग अजून होणार आहे..सध्या काही काळ सुट्टीसाठी तो मूळगावी औरवाड येथे आला आहे .

     उज्वल यश मिळवणारा आणि ग्रामीण भागातून जाऊन आपल्या गावाची पताका देशसेवेसाठी  फडकविणारा  पुढील पिढीसाठी आदर्शवत ठरणाऱ्या युवकाचे औरवाड सह परीसरात विशेष कौतुक होत आहे.

   त्याच्या पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा