प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
१९ च्या प्रादुर्भावामुळे शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र अंतिम वर्ष अंतिम सत्राच्या एकूण ४३८ अभ्यासक्रमाच्या परीक्षा आज दि.१० ऑगस्ट २०२१ पासून ऑनलाईन पध्दतीने सुरळीतपणे सुरु झाल्या या परीक्षा अत्यंत सुरळीतपणे व निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी विद्यापीठ परीक्षा विभागाने सर्वोतोपरी तयारी केली आहे.
या परीक्षेसाठी एकूण १२०७४० इतके विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्व संबंधित विद्यार्थ्यांना यापूर्वीच त्यांनी दिलेल्या ईमेल व एसएमएस द्वारे परीक्षेसाठीचा लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात आला आहे. तसेच सर्व परीक्षांची वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.ऑनलाईन परीक्षेमध्ये काही तांत्रिक अडचण उद्भवू नये यासाठी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणीचे निराकरण करणेसाठी तसेच सॉफ्टवेअर पुरवठादार कंपनीची यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्री गजानन पळसे यांनी दिली.
आज दि. १० ऑगस्ट २०२१ रोजी B.Com IT. B.Com Bank Management, B.Sc.-Bio-Tech, B.Sc.-I.T., B.Sc. - Sugar Tech, B.Sc. Animation, B.Sc.- Forensic Science, B.Sc.-Food Processing & Packaging, BCS/BSc-Computer Sc., Bachelor of Interior Designing. Bachelor of Dress Making & Fashion Co-ordination, B.A.- Multimedia इस परीक्षा पार पडल्या आजच्या परीसाठी एकूण १३१५ विद्यार्थ्यापैकी १२९१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा दिली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा