प्रविणकुमार माने : उपसंपादक
जयसिंगपूर ता.शिरोळ जि कोल्हापूर येथे एका वृदध इसमाने राहते घरातील लाकडी तुळीस साडीने गळयास गळफास लावून आत्महत्या केलेची खळबळजनक घटना जयसिंगपूर शहरात घडलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,नाना दत्तू सासणे व.व.65 रा.गल्ली नं 13,जयसिंगपूर ता.शिरोळ जि कोल्हापूर
यांनी तारीख 02/08/2021 रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या पूर्वी त्यांचे राहते घराचे लाकडी तुळीस साडीने गळयास गळफास लावून आत्महत्या केलेली आहे .त्यातून त्यांचा मृत्यू झालेला आहे अशी वरदी मयताचे नातू लखन दिपक सासणे रा. बिरदेव मंदिर, समर्थ चौकाजवळ, गडमुडशिंगी ता.हातकणंगले
जि.कोल्हापूर यांनी दिलेली आहे. आत्महत्येचे कारण अदयापही समजू शकलेले नाही.वरदीदार लखन सासणे यांच्या वरदीनुसार म.पो.हे.काॅ.सावंत यांनी मयत दाखल केलेली आहे. सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास हा म.पो.ना.कांबळे साहेब करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा