जीवन आवळे : कोथळी प्रतिनिधी
कोथळी येथील. आदर्श विद्यालय रोड लगत असणाऱ्या दिलीप इंगळे यांच्या विहिरीत मगर आढळल्याने नागरिकाकडून घबराट निर्माण झाली आहे.
नुकत्याच येऊन गेलेल्या महापुराने कोथळी गाव 90 टक्के महापुराखाली गेले होते त्यातच आदर्श विद्यालय रोड रोडवर ही पाणी आले होते पण महापूर ओसरून गेल्यानंतर ही मगर त्या विहिरीत वास्तवास असण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आहे.रोड लगत असणाऱ्या विहिरीवर मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झाला आहे. तसेच मगरीचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांकडून जोरकस मागणी होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा