Breaking

सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

सांगलीत पुनश्च एकदा आश्वासन ; महापुराचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्याचा केला जाणार प्रयत्न तसेच रात्री ८ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याचा निघणार आदेश

 

मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे


प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


सांगली : मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची आज सांगली जिल्ह्यातील महापुराने बाधित असलेल्या निवडक भागांना भेटी दिल्या. त्यानंतर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात महापुराच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना महापुराच्या पार्श्वभूमीवर याअगोदर महापुराचे निराकरण करण्यासाठी तसेच महापुरावर कायमचा तोडगा काढण्याकरिता सरकार विविध समित्यांचे गठण करून पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यास सरकार तयार आहे किंबहुना कटिबद्ध आहे अशा प्रकारचं संवाद त्यांनी पत्रकारांशी साधला.

         पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी साधक-बाधक पद्धतीने  उत्तरे देऊन समाधानी करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी कालवे, भुयारी बोगदे किंवा अन्य मार्गाने महापुराचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे अशा पद्धतीने त्यांनी पुनश्च एकदा आश्वासित केले. तसेच आढावा बैठकीच्या वेळेस पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्ना बाबत उत्तर देताना ते म्हणाले की, राज्यात निर्बंध लवकरच शिथिल होणार आहेत. प्रशासनाकडून माहिती घेऊन कोरोना बाधितांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यात रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल, मात्र कोरोना जास्त जिल्ह्यात ही अट शिथिल केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले. 

  त्याकरिता संबंधित कोरोनाग्रस्त जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

    माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत देणं सुरू झाले आहे.लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश आलं आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने आपत्ती ओढावली आहे. काही वस्त्यांचं पुनर्वसन आवश्यक, नागरिकांनी यामध्ये सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे.     

    निसर्गासमोर मोठे डॅम देखील वाहून गेले आहेत त्यामुळे आपण आपण हतबल आहोत असं देखील सांगितलं. सांगलीतील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

    याचबरोबर, मी दोन-चार दिवसांपासून सर्वांना सांगतोय की, काही ठिकाणी काही प्रसंगी कठोर निर्णय हे आपल्याला घ्यावे लागतील. याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत आपण आपली कामं, ज्याला आपण विकास कामं म्हणतो ती करत गेलो. पण ही आता आपत्ती आणि आपत्तीची वारंवारतेचे स्वरूप जर आपण पाहिली तर ते  हे अधिकाधिक भीषण होत चाललेलं आहे. काही दिवसांचा काही महिन्यांचा पाऊस हा काही तासांत किंवा एक दिवसात पडायला लागलेला आहे. प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होते आहे. दरडी कोसळत आहेत, रस्ते खचत आहेत असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.

1 टिप्पणी: