Breaking

सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

*ब्रेकिंग! ठाकरे सरकारकडून कोरोना च्या पार्श्वभूमीवर नवीन नियमावली जाहीर : नेमके काय सुरू व बंद आहे ते जाणून घेऊया?*



मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने कोरोना नियमाच्या अटीबाबत उलट-सुलट चर्चा असते. प्रत्येक घटक हा आपल्या सोयीनुसार कोरीना नियम असावेत अशी अपेक्षा असते. मात्र शासन राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन कोरोना सद्य परिस्थितीचा अभ्यास करून नियमावलीमध्ये बदल करीत असते. याच अनुषंगाने गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये लक्षणीय घट होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधून अनलॉकची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संपुर्ण अनलॉक नाही तर नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील 11 जिल्ह्यांमधे निर्बंध कायम ठेवले आहेत.

    नव्या नियमावलीनुसार, सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र शनिवारी दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. सर्व मैदानं आणि बागा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. सरकारी आणि खाजगी कार्यालये पुर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी असणार आहे.

      जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येणार आहेत. तर हे सर्व शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आणि रविवारी दुकान पूर्णपणे बंद असणार आहेत. मुंबईमधील लोकलसेवा अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे.

   दरम्यान, मुंबई आणि ठाण्याचा निर्णय आपत्कालीन विभाग घेणार आहे. कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास परवानगी मिळाली आहे. 

  सर्वात महत्त्वाचे म्हणजे सक्रीय रूग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड आणि पालघर यांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा