शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी - रोहित जाधव
सध्या कोल्हापूर जिल्हाला महापुराच्या मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याचं जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला सुद्धा महापुराचा मोठा फटाका बसला असून तालुक्यातील शिरोळ, घालवाड , कुटवाड, कनवाड, कुरुंदवाड, अकिवाट , राजापूर, खिद्रापुर या गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या गावातील लोकांना मदतीचा हात म्हणून द अक्षय पात्र फाऊंडेशन यांच्या टीममधून संदीप गोरे व अमोल पोवार हे दाल खिचडी, मसाले भात असे पौष्टीक आहार गेली पाच दिवसांपासून जयसिंगपूर येथील ज्ञानानंद महाराज मठ येथे बनवून सर्व गावात जाऊन दिले जाते. या मदत कार्यात अमित मगदूम, विकास देवाळे , पंकज गुरव, बबलू शिंदे,किरण गुरव, श्रेयस पाटोळे, मनोज हजारे, सुमित धोतरे, शुभम लुगडे, सुनील चाबरे , ओमकार नेर्लेकर, ओमकार नार्वेकर, अमित बडवे, जयजित परितकर व श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांची जयसिंगपूर येथील टीम युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा