मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
कोथळीच्या मातोश्री सोशल फाउंडेशनकडून १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मातोश्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जीवन आवळे यांनी पत्नी सौ.श्रेया जीवन आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त आई वृद्धाश्रम या सामाजिक संस्थेला मातोश्री सोशल फाउंडेशनकडून किटचे वाटप करण्यात आले यामध्ये प्रत्येक व्यक्तीस चार दिवस पुरेल असे एक छोटेसे परिपूर्ण किट मातोश्री सोशल फाउंडेशन कडून तयार करून वृद्धाश्रमास देण्यात आले.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना जीवन आवळे म्हणाले की, आई वृद्धाश्रम ही निस्वार्थी भावनेने वृद्ध लोकांची सेवा करत असून त्यांच्या कार्याचे कौतुक करून इथून पुढे मातोश्री सोशल फाउंडेशन कडून आई वृद्धाश्रमास मदतीची साथ दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आई वृद्धाश्रमचे संस्थापक श्री संजय भोसले यांनी मातोश्री सोशल फाउंडेशनचे आभार व्यक्त करताना ते म्हणाले की,आपल्या नावाप्रमाणेच आम्हाला मातृत्वाची छाया द्याव.
त्याच बरोबर श्रावणबाळ दिव्यांग मुलांचे संस्था याठिकाणीही मातोश्री सोशल फाउंडेशनकडून दिव्यांग मुलांना स्वातंत्र्य दिना दिवशी एक सुंदर खाद्य कीट देऊन स्वातंत्र्यदिना त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दिव्यांग मुलांनीही कीट आवडीने घेत मातोश्री सोशल फाउंडेशनचे आभार मानले.
दिव्यांग मुलांनी त्यांच्या कलागुण सादर करीत सर्वांना आश्चर्यचकित केले. याप्रसंगी या सर्व विद्यार्थ्यांचे कलागुणांचे कौतुक करीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास जय हिंद डिजिटल पोर्टलचे मुख्य संपादक प्रा.डॉ.प्रभाकर माने,प्रा.डॉ.मनोहर कोरे,प्रा.अक्षय माने, पटेल सर, कासमआली फकीर सर, पत्रकार हुसेन शेख, मातोश्री सोशल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अमोल बरकडे, सचिव सुशांत चूडाप्पा, खजिनदार रमेश घाटगे, सदस्य अर्जुनसिंग राजपूत, उमेश पवार, गौरव गांजे, निखिल नंदीवाले, रोहन पाटोळे, मेघा हडपद, मुस्कान घोरी यासह आई वृद्धाश्रमाचे व श्रवणबाळचे विकलांग संस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जीवन आवळे व त्यांच्या टीम कडून पार पडलेला समाजोपयोगी उपक्रम हा कौतुकास्पद असून आजच्या युवा पिढीला एक आदर्शवत आहे अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा