Breaking

बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

हातकणंगले येथे चर्च ऑफ नार्थ इंडिया नवी दिल्ली यांचे वतीने गरजूंना मदत*

 


शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी - रोहित जाधव


कोरोना महामारी काळात सर्वत्र गोरगरीब हातावरचे पोट असणाऱ्या विधवा तसेच निराधार लोकांचे सर्वत्र हाल होत आहेत, एक वेळ भोजनाची देखील अवस्था फार अडचणीची झाली आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून कोरोना असो अथवा महापूर अशा प्रत्येक अडचणीत लोकांना मदत करण्यासाठी चर्च ऑफ नार्थ इंडिया नवी दिल्ली असे अनेक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत, तसेच काल हातकणंगले व इतर भागातील 65 निराधार महिलांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप तसेच N95 मास्क, स्यानीटायझर,ऑक्सोमीटर इत्यादी साहित्य कोल्हापूरचे बिशप एम.यु.कसाब SBSS कोल्हापूर चे समन्वयक माननीय योसेफ आवळे सर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.


      यावळी निलेश सावंत, विद्या आवळे, मिलन मोरे,विजया एतवडेकर, योसेफ तिवडे,अजय सदामते,सुनील लोखंडे इत्यादी संस्थेचे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा