शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील मार्च / एप्रिल २०२१ उन्हाळी सत्रातील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दि. १० ऑगस्ट २०२१ पासून ऑनलाईन पध्दतीने प्रारंभ झालेल्या आहेत. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रिय गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० दि. ०४ सप्टेंबर, २०२१ रोजी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे सदर परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थी हितास्तव खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रिय गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०
दि. ०४ सप्टेंबर, २०२१ रोजी होणार असल्याने सदर दिवशी शिवाजी विद्यापीठामार्फत सुरू असलेल्या परीक्षेचे कोणतेही पेपर होणार नाहीत. त्याऐवजी शनिवार दि. ०४ सप्टेंबर, २०२१ रोजीचे सर्व पेपर्स रविवार दि. ०५ सप्टेंबर, २०२१ रोजी यापूर्वी परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आयोजित करण्यात येत आहेत.
सदरचे परिपत्रक सर्व संबंधीत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणावे, अशा प्रकारची माहिती मा.गजानन पळसे प्र. संचालक (परीक्षा व मूल्यमापन मंडळ) यांनी दि.२५ ऑगस्ट २०२१ च्या जा.क्र. शिवाजी वि. / परीक्षक नियुक्ती /आरव्हीसी / ६४० च्या परिपत्रकाद्वारे दिली आहे.
अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला आवश्य भेट द्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा