हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
▪️कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीचा रेट दहाच्या आत असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश तिसर्या टप्यात कायम आहे. जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा घेतलेल्या निर्णयात सर्व व्यापारी दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहतील, असे आदेश काढले. शनिवार व रविवार हा वीकेंड लॉकडाऊन कायम राहणार आहे.
▪️वीकेंड लॉकडाऊन वगळून सोमवार ते शुक्रवार रेस्टॉरंट पन्नास टक्के क्षमतेसह सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यानंतर पार्सल सकाळी ५ ते ९ यावेळेत सुरू राहिल,
▪️सर्व मैदाने, जीम सुरू राहणार आहेत.बांधकामे सर्व दिवशी पूर्णवेळ सुरू राहतील.
▪️कामगारांनी कामाच्या ठिकाणी सकाळी ७ ते ४ या वेळेत काम करायचे आहे.
▪️लग्नसमारंभासाठी २५ लोकांना उपस्थितीची परवानगी आहे. अंत्ययात्रा, अंत्यविधीसाठी २० लोकांची उपस्थिती राहील.
▪️स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच बैठकांना ५० टक्के उपस्थिती राहील
▪️व्यायामशाळा, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स हे सकाळी ७ ते ४ या वेळेत ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
▪️चित्रीकरणाची परवानगी सर्व दिवशी सकाळी ७ ते ४ या वेळेत करण्याला परवानगी आहे.या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खात्री संयोजकांनी घ्यावी.
▪️या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापनेवर दंडात्मक फौजदारी कारवाई करण्याचा इशारा अप्पर जिल्हा दंडाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिला आहे.
--------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा