![]() |
प्र.प्राचार्य डॉ.सुरत मांजरे |
प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक
शिरोळ तालुक्यात नावाजलेले व शैक्षणिक गुणवत्तापूर्ण व सर्व सोयींनी परिपूर्ण असलेल्या जयसिंगपूर कॉलेजच्या प्र.प्राचार्यपदी डॉ.सुरत मांजरे यांची वर्णी लागली आहे.
प्रा.डॉ.सुरत मांजरे यांचा शैक्षणिक प्रवास हा मिरज तालुक्यातील बेडग या गरीब शेतकरी कुटुंबापासून ते प्र.प्राचार्य पदापर्यंत अत्यंत संघर्षमय पद्धतीचा राहिलेला आहे. सन 1988 मध्ये जयसिंगपूर कॉलेजमध्ये पार्ट टाइम या तत्त्वावर नोकरीला नोकरी सुरुवात केली आणि 1990 मध्ये पूर्णवेळ प्राध्यापकपदी निवड झाली.1990 पासून ते आजतागायत विद्यार्थी व संस्था केंद्रबिंदू मानून प्रामाणिक व परिपूर्ण ज्ञानसंपन्न असणारे डॉ. मांजरे यांनी ज्ञानदाता म्हणून अध्यापन कामाची पद्धत आयुष्यभर जोपासण्याचा प्रयत्न केला.
कॉलेजने NAAC च्या कॉर्डिनेटर पदाची जबाबदारी सोपविल्यानंतर त्यांनी सार्थ ठरवित सन २०१५ मध्ये कॉलेजला 'A' मानांकन प्राप्त करून देण्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.त्यांच्या शैक्षणिक प्रवासातला ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे.कॉलेज व्यवस्थापनाने त्यांच्यावर विश्वास ठेवून उपप्राचार्य पदाचा भार दिल्यानंतर त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली. अल्पावधीतच कॉलेजमध्य बटरफ्लाय गार्डन,बायोडायव्हर्सिटी म्युझियम अँड इन्फॉर्मेशन सेंटर अज लर्निंग रिसोर्स, वनौषधी उद्यान व कॉलेज परिसर विकास व पर्यावरणपूरक सुशोभिकरण हे त्यांच्या कॉलेजप्रती कामाची ठळक वैशिष्ट्ये व उपक्रम आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या काही निवडक कॉलेजमध्ये त्यांनी जयसिंगपूर कॉलेज चे नाव अबाधित करण्याचा प्रयत्न केला आहे.
शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्याबद्दल असणारी ओढ पाहता राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा यामध्ये २०१९च्या महापुराच्या काळातील नेत्रदीपक योगदान, एड्स जनजागृती रॅली,जयसिंगपूर शहर परिसर स्वच्छता,मतदान जनजागृती, कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी रचनात्मक काम, 'संविधान बचाव - देश बचाव' या टॅग खाली कार्य ते सातत्याने करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कर्मवीर कौशल्य केंद्रातर्गत २९ कोर्सेस व मूल्यधारित १४ कोर्सच्या माध्यमातून कौशल्य निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे
विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम व कलागुणांना वाव देण्यासाठी युथ फेस्टिवलच्या माध्यमातून जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी तसेच सलग तीन वर्ष जिल्हास्तरीय लोकनृत्य प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. त्यांच्या काळात सांस्कृतिक विभागाला ऊर्जितावस्था प्राप्त झाली होती.
कॉलेजच्या प्रत्येक उपक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदवणारे व्यक्तिमत्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. आवश्यकतेनुसार बोलणं मात्र कामाला प्राधान्य देणे तसेच उद्दिष्टानुसार नियोजनबद्ध काम करणे हे त्यांच्या अंगवळणी पडले आहे.
विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शैक्षणिक कार्याला त्यांनी महत्व दिले. एम.फिल.व व पीएच.डी. या पदवी संपादणूकीसाठी त्यांना UGO,WRO यांचेकडून फेलोशिप FIP मिळाली. त्यांना संशोधनात्मक कार्याची बाजू पाहता आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय असे एकूण 22 संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. संशोधनात्मक कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी UGC चे २ Minor Research Project पूर्ण केले. याच बरोबर UGC Sponcerd नॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन याच्या जोडीला महाविद्यालयात सर्च नावाचं संशोधनात्मक त्रैमासिक सुरू करून त्याचे उत्तम पद्धतीने संपादकीय कार्य करून या माध्यमातून एक संशोधनात्मक मोठी झेप घेतली. सध्या ते पीएच.डी.चे संशोधन मूल्यांकन व विषय तज्ञ म्हणून काम करीत आहेत. या संशोधन कार्याबरोबर ,इंडियन काँग्रेस सोसायटीचे' ते आजीव सभासद आहेत.
नोकरीच्या या प्रदीर्घ काळात त्यांनी 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर हा 'वन्य प्राणी सप्ताहाचे' आयोजन करून विद्यार्थ्यांना जागृत करणे, स्पर्धा व पोस्टर सादरीकरण हे उपक्रम सातत्याने आज तागायत राबविले जात आहेत. त्याचबरोबर सामाजिक दायित्व म्हणून मासेमारी करणाऱ्या बांधवांसाठी गोड्या पाण्यातील मत्स्य शेती उत्पादन वाढीसाठीचे योग्य मार्गदर्शन व समुपदेशन केले जात असतं.
स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील व अन्य स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी डॉ.मांजरे यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून शैक्षणिक विकासात्मक कार्याला गती देण्यासाठी प्र.प्राचार्य पदाची जबाबदारी सोपविली आहे. खरंच प्रा.डॉ.सुरत मांजरे यांच्या रूपाने जयसिंगपूर कॉलेजला ज्ञानदाता व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक,संशोधक, प्रशासकीय उत्तम जाण असणारे, मनमिळावू व काळानुरूप परिस्थितीचं भान ठेवून सर्व घटकांना एकत्रित करून कॉलेज व संस्थेच्या विकासासाठी कटिबद्ध असणारा एक परिपूर्ण व्यक्तिमत्व मिळाले आहे. साहजिकच या सर्व अपेक्षा पूर्ण करतील हा आशावादी दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून डॉ. मांजरे यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याला खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन सर
उत्तर द्याहटवा