Breaking

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

*नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठे व महाविद्यालय सुरू करण्याचा विचार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत*



प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक


कोरोना महामारीने सर्वच क्षेत्राला  प्रभावित केले असून शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. परिणाम स्वरूप गेल्या कित्येक महिन्यांपासून शाळा,महाविद्यालये,विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्था बंद आहेत. प्रत्येक घटकाला महाविद्यालय कधी सुरू होतील याची उत्सुकता लागली आहे. 

     मात्र काल मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.उदय सामंत यांनी विद्यापीठे व महाविद्यालये १५ सप्टेंबर ते १ ऑक्‍टोबर या कालावधीत सुरू केले जाणार असल्याचे सकारात्मक संकेत दिले आहेत.

         तसेच राज्यातील सर्व पारंपरिक विद्यापीठे आणि त्याअंतर्गत संलग्न असणारे सर्व महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूची बैठक संपन्न झाली आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या असून नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठे व महाविद्यालय सुरू करण्याचा  विचार सरकारधीन आहे अशा प्रकारची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा