Breaking

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

*जयसिंगपूर पोलीसांनी अट्टल चोराच्या मुसक्या आवळल्या*

 


प्रविणकुमार माने : उपसंपादक


    जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथे भरदिवसा आणि रात्री होणाऱ्या बॅटरी मालाविरूदधच्या चोऱ्या येथील गुन्हे शोध पथकाने 24 तासाच्या आत उघडकीस आणून चोरट्याविरूदध कारवाई करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    याबाबत अधिक माहीती अशी की, दिपक बबन पाटील रा.प्लॉट नं 51,स्वप्ननगरी, जयसिंगपूर यांच्या राहते घरासमोरून त्यांच्या मालकीची महिंद्रा जितो कंपनीच्या एम.एच.43 बी.बी 1965 क्रमांकाच्या गाडीमधील 4500/रू.किंमतीची बॅटरी अज्ञात चोरट्याने दि 08/08/2021 रोजी रात्री 23.00.वा.ते दि 09/08/2021 रोजी सकाळी 11.वा.दरम्यान चोरून नेलेबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

     त्याप्रमाणे पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूदध दि.25/08/2021 रोजी  भा.दं सं कलम 379 नुसार गु.र.नं.323/2021 अन्वये गुन्हा दाखल केलेला होता.परंतु सदर गुन्ह्यातील आरोपी हा पोलीसांना मिळून आला नव्हता. तथापी हद्दीत घडणाऱ्या मालाविरूदधच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पो.नि.बोरीगीडडेसो, तपासी अंमलदार मगदूम व जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील शोध पथकातील अंमलदार असे सर्व मिळून गुन्ह्यातील फरारी आरोपी व चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेत असताना पोलीस काॅ.डावाळे यांना गोपनीय बातमीदार यांचेकडून सदर गुन्ह्यातील आरोपी सुरेश शिवाजी गोसावी व.व.30 रा.लक्ष्मीनगर, जूना बुधगाव रोड,सांगली ता.मिरज जि.सांगली याने सदरचा गुन्हा केले असलेची खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूरच्या मागे सापळा रचून ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यानेच केल्याचे कबूल केलेले आहे.

      सदर आरोपीकडून पोलीसांनी गु.र.नं 323/2021 मधील व अन्य गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल असे एकूण  ₹ 51,500/किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीचे विरूदध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एकूण 04, कुपवाड पोलीस ठाण्यात 01, सांगली शहर पोलीस ठाण्यात 01 आणि मिरज शहर पोलीस ठाण्यात 01 अशी वेगवेगळ्या गु.र.नंबरची चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

     सदर आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस अधिकारी ,पो.नि.बोरिगिड्डे ,पो.ना.मगदूम , चालक देशमुख,पो.काॅ.डावाळे,पो.काॅ सुर्यवंशी, पो.काॅ.भोसले आणि म. पोलीस.काॅ.देसाई यांनी केलेली आहे.

      एका सराईत व अट्टल चोरट्यास अटक केली असून  सदरची  कारवाई ही सर्वात मोठी असल्याने जयसिंगपूर पोलीसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा