नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना आज घडली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योत्सना मेश्राम यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांनी राहत्या बिल्डींगच्या नवव्या माळ्यावरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ज्योत्सना मेश्राम या बेलतरोडी येथील फॉर्च्युन श्री अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. आज दुपारी त्यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मेश्राम यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ज्योत्सना मेश्राम यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु, पतीच्या मृत्यूपासून त्या मानसिक तणावात असल्याचे सांगितलं जात आहे.
डॉ.ज्योत्सना मेश्राम या माजी कुलगुरू दिवंगत डॉ. सुधीर मेश्राम यांच्या पत्नी होत्या. डॉ. सुधीर मेश्राम यांचं वयाच्या 66 व्या वर्षी मार्च महिन्यात निधन झाले होते. ज्योत्स्ना मेश्राम या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहत होत्या. आज त्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली.
त्यांच्या पश्चात मुलगा सिद्धार्थ आणि मोठा आप्तपरिवार आहे. ज्योत्सना मेश्राम यांच्या आत्महत्येमुळे नागपूरच्या शिक्षण श्रेत्रात मोठी खळबळ उडाली असून शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा