प्रविणकुमार माने : उपसंपादक
जयसिंगपूर ता.शिरोळ जि कोल्हापूर येथील कोंडीग्रे हद्दीतील रिलायंस पेट्रोल पंपासमोर जिप्सीवरील अनोळखी चालकाने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर येथील सांगली-कोल्हापूर रोडवर कोंडीग्रे हद्दीतील रिलायंस पेट्रोल पंपासमोर ही अपघाताची घटना घडली आहे.
ता. 01/08/2021 रोजी सुमारे रात्री 21.15 वाजता फिर्यादी अजय हरीलाल कहार व.व 21 रा. मूळ गाव बेलसडी,ता.खजणी जि. गोरखपूर (उत्तरप्रदेश) सध्या रा.द्वारा गणेशनगर, 5वी गल्ली, इचलकरंजी आणि साक्षीदार संतोष असे त्याच्या मालकीची स्प्लेंडर कंपनीच्या मोटर सायकलवरून जयसिंगपूर कडून इचलकरंजीकडे सांगली-कोल्हापूर रोडने जात असताना कोंडीग्रे गावचे हद्दीतील रिलायंस पेट्रोलसमोर रात्री 21.15 चे सुमारास आले असता कोल्हापूरकडून जयसिंगपूरकडे 'टो' करून आणली जाणारी जिप्सी वरील अनोळखी चालकाने ती जिप्सी अचानक रोडचे मध्यभागापासून राँग साईटला नेऊन फिर्यादीचे मोटारसायकलला समोरून धडक देवून त्याचे उजव्या पायाच्या मांडीचे व नडगीचे हाड मोडून तसेच दोन्ही हातास डाव्या डोळ्याजवळ खरचटून गंभीर व किरकोळ दुखापत केली आहे. तसेच साक्षीदारासही किरकोळ दुखापत झाली आहे. गंभीर फिर्यादीस व साक्षीदारास पायोस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.मा पोलिस निरीक्षकसो यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास हा स्व:ता मा.पोलिस ना.निकमसाहेब करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा