Breaking

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

कुटवाड गावचे सुपुत्र शहीद नायब सुभेदार राजेंद्र धोंडीराम पाटील अनंतात विलीन

 

शहीद राजेंद्र पाटील


मालोजी माने : कार्यकारी संपादक


शिरोळ : शिरोळ तालुक्यातील कुटवाड गावचे सुपुत्र नायब सुभेदार राजेंद्र धोंडीराम पाटील यांची भारतीय सैन्यदलामध्ये दिल्ली येथे कर्तव्य बजावत असताना दुःखद निधन झाले.आज कुटवाड येथे त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी  सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर  यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


     नायब सुभेदार राजेंद्र पाटील यांचा सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. पाटील हे 24 वर्षांपूर्वी सैन्यदलात भरती झाले होते.सध्या ते दिल्लीत नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मागे आई-वडील, दोन भाऊ व भावजय असा परिवार आहे.

       यावेळी सैन्यदलातील सर्व पदाधिकारी, तहसीलदार, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       कुटवाड गावात दुःखाचं व भावनाविवश वातावरण निर्माण झाले असून शिरोळ तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा