पुणे : एमपीएससी (MPSC) परीक्षार्थींच्या आंदोलनानंतर आयोगाने संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली खरी 2020च्या या सरळ सेवा वर्ग 2 दोनच्या परीक्षेत पीएसआय पदासाठी धनगर समाजाला अवघ्या 2 तर वंजारी समाजाला एकही जागा राखीव न मिळाल्याने या दोन्ही समाजाच्या परीक्षार्थींमध्ये सध्या प्रचंड असंतोष खदखदत आहे.
या जाहिरातीत पीएसआयची 650 पदं असल्याने NT-C प्रवर्गासाठीच्या 3.5 टक्के आरक्षणानुसार धनगर समाजाला किमान 23 जागा मिळणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात मिळाल्यात अवघ्या 2 जागा!!! NT-D प्रवर्गासाठी तर एकही जागा राखीव ठेवण्यात आलेली नाही त्यामुळे वंजारी समाजाच्या परीक्षार्थींना आता नाईलाजास्तल खुल्या प्रवर्गातून परीक्षेला बसावं लागणार आहे
प्रत्यक्षात NT-D प्रवर्गाला या जाहिरातीत किमान 13 जागा राखीव असणं अपेक्षित होतं पण मंत्रालयातील बाबू लोकांनी बिंदू नामावलीच्या आरक्षणात प्रचंड घोळ घातल्यानेच हा तिढा निर्माण झाल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे. शासन निर्णयानुसार खुल्या वर्गातून भर्ती झालेल्या कँटगरीतील उमेदवारांना खरंतर आरक्षित जागेवर गृहित धरू नये, असा शासन निर्णय झालेला असतानाही पदोनत्ती आरक्षणाचे फायदे लाटण्यासाठी संबंधित खात्यांतर्गंत कर्मचारी जातीचे दाखले जोडतात आणि स्वत:ला प्रमोट करून घेतात. त्यामुळे या दोन्ही समाजाचं आरक्षण शासन दप्तरी सरप्लस दाखवलं जातं आणि नवीन भर्ती करताना या दोन्ही प्रवर्गासाठी नवीन जागाच तयार होत नाहीत. म्हणूनच शासनाने या दोन्ही समाजाला त्यांच्या हक्काच्या आरक्षित जागा वाढवून द्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी सरकारला जागा वाढवून देण्यासाठी निवेदन देखील दिली आहेत, पण शासन यावर काहीच निर्णय घेत नसल्याने या दोन्ही समाजाचे परीक्षार्थी प्रचंड अस्वस्थ बनले आहेत. कोरोना साथीमुळे गेली दोन वर्षे एकतर एमपीएससीचं संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झालं आणि ऐन-केन प्रकारे एखादी परीक्षा जाहीर झालीच तर त्यातही आपल्याला राखीव जागाच मिळणार नसतील तर अभ्यास तरी कशाच्या भरवशावर करायचा. बरं समजा खुल्या प्रवर्गातून मिरीटच्या जोरावर पदं मिळवली तर तिकडून एकप्रकारे खुल्या प्रवर्गातील इतर मुलांवर अप्रत्यक्ष अन्याय होण्यासारखंच आहे, अशी भावना एमपीएससी उमेदवारांमध्ये बळावू लागलीय, म्हणूनच शासनाने यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी एसपीएससी समन्वयक समितीचे महेश घरबुडे यांनी केली आहे. NT- C, NT-D मुलांवर कसा होतोय अन्याय? एनटी सी(धनगर) आरक्षण - 3.5 टक्के 2020 च्या पीएसआय जाहिरातीत 23 जागा मिळणं अपेक्षित पण प्रत्यक्षात मिळाल्या फक्त 2 जागा एनटी डी(वंजारी) आरक्षण - 2 टक्के 2020 च्या पीएसआय पदासाठी 13 जागा मिळणं अपेक्षित पण प्रत्यक्षात एकही जागा मिळाली नाही शासननियमानुसार खुल्या प्रवर्गातून भर्ती झालेल्या कॅटगरीतील मुलांनाही ओपनमध्येच ग्राह्य धरणं अपेक्षित पण पदोन्नती आरक्षण मिळवण्यासाठी नंतर जातीचे दाखले जोडले जातात. या पळवाटीमुळे ओपन आणि आरक्षित अशा दोन्ही समाजाच्या मुलांवर अन्याय होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा