पुणे येथील नरेंद्र मोदी यांचे मंदिर |
पुणे: औंध गावातील ॲड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे व आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोदी मंदिर उभारले होते. परंतु रातोरात हे मंदिर तेथून हटवण्यात आले आहे. पंतप्रयातधान कार्यालायातून कानपिचक्या दिल्याने हे मंदिर हटविल्याची चर्चा आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाने या मंदिरासमोर उपहासात्मक आंदोलन करत पेट्रोल आणि डिझेलचा नैवेद्य दाखविण्यात आला.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलणार होते नवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर हटवण्यात आल्याची माहिती बाहेर पडताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घटनास्थळी जमले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उपरोधिक आंदोलन केले.
'देशापुढे असलेले प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही मंदिरात आलो होतो.मात्र भाजपचा देव काही केल्या आम्हाला दिसत नाही. पेट्रोल, डिझेल, सिलिंडरचे दर कमी होऊ दे,यासाठी नवस बोलायला आम्ही इथे आलो. पण मंदिरात देवच नाही, त्यामुळे देवच दिसत नसल्यानं आम्हाला अगदी भरून आले,’
या मंदिरासमोर पेट्रोल- डिझेलचा नैवेद्य दाखवू,दर कमी झाले तर पेट्रोल आणि डिझेलने अभिषेक घालून असा उपहासात्मक नवस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोलला आहे.
हेही वाचा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा