प्रा. अभय जायभाये |
प्रा.डॉ प्रभाकर माने : मुख्य संपादक
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने कन्या महाविद्यालय, मिरज येथे दि.18 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे समन्वयक अभय जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी संस्थेचे सचिव राजू झाडबुके, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.शर्वरी कुलकर्णी या उपस्थित होत्या.
सुरुवातीस 2019-20 कार्यआढावा बैठक पार पडली बैठकीतील उपस्थित मान्यवर व समस्त कार्यक्रम अधिकारी यांचे स्वागत प्रा.सागर लटके-पाटील यांनी करून प्रास्ताविकात त्यांनी सांगली जिल्हा कार्यआढावा बैठकीचा हेतू स्पष्ट केला.
यानंतर सांगली जिल्हा कार्यकारणीमध्ये नवनियुक्त पदाधिकारी प्राध्यापकांचे सत्कार संस्थेचे सचिव मा. राजू झाडबुके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या मौलिक मार्गदर्शनच्या माध्यमातून उपस्थितांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर शिवाजी विद्यापीठाचे उपक्रमशील नेतृत्व एन एस एस समन्वयक प्रा.अभय जायभाये म्हणाले,विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एनएसएसचे काम संपूर्ण देशासाठी दीपस्तंभासारखे आहे. त्याचे आपण घटक असल्याचा सार्थ अभिमान ही त्यांनी स्पष्ट केला. तसेच सांगली जिल्हा सहसमन्वयक प्रा.धनंजय लोहार यांनी ही बैठक यशस्वी होण्यासाठी नियोजनबद्ध मार्गदर्शन केले.
या मिटिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कर्षासाठी असंख्य विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये गतवर्षीच्या कार्यक्रमांचा आढावा, 2021-22 नियमित कार्यक्रम व विशेष शिबिर कार्यक्रमाबाबत चर्चा,आपत्ती व्यवस्थापन कार्यासह माझे गाव-कोरोना मुक्तगाव अभियान कार्यक्रमाचा आढावा, 21- 22 मधील प्रवेशित स्वयंसेवकांची एक्सेल शीट,यावर्षी नव्याने प्रस्तावित विद्यापीठ स्तरीय प्रजासत्ताक दिन संचलन शिबिर व चित्ररथ स्पर्धा तसेच जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय उत्कर्ष सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा याबाबत विचार विनिमय,
राष्ट्रीय सेवा योजना सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त तयार करावयाच्या पुस्तकेबाबत,राष्ट्रीय सेवा योजना तिमाही व वार्षिक अहवाल विहित कार्य कालमर्यादेत सादर करण्याचे ठरले विद्यापीठ प्रशासन राज्य शासन
तसेच आयत्या वेळच्या विषयामध्ये सन 2019-20 ऑडिट करण्यासंदर्भात चर्चा,विद्यार्थ्यांचे 10 मार्क द्यावयाचे फॉर्म लवकर सबमिट करण्याचे,माझं गाव कोरोनामुक्त गाव अभियानांतर्गत घेतलेल्या दत्तक गावांची माहिती,महापूर व्यवस्थापन आढावा तसेच चालू वर्षातील कामांचा अहवाल अहवाल,भुजल सर्वेक्षण माहिती,युआरडी /प्रिआरडी/डीआर साठी पाठवणारे स्वयंसेवक हे सर्व निकषात बसणारे असावेत असे ठरले,विद्यापीठ प्रजासत्ताक दिनासाठी 60 स्वयंसेवकांची युनिट अशा असंख्य विषयावर सांगोपांग चर्चा झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या कॉलेजच्या प्राचार्य डॉ.शर्वरी कुलकर्णी म्हणाल्या की, राष्ट्रीय सेवा योजना विभागाने कोरोना महामारीच्या काळात केलेले काम अत्यंत कौतुकास्पद असून त्यांनी भविष्यात ई-कचरा या विषयी कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सदर मिटिंगसाठी डॉ.सागर लटके- पाटील यांनी उत्तम नियोजन केले.सदर कार्यक्रमाचे आभार सांगली जिल्हा सहसमन्वयक डॉ.धनंजय लोहार यांनी मानले.
सदर यशस्वी बैठकीचे सर्व कार्यक्रम अधिकारी यांचेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा