![]() |
प्रभारी प्राचार्य ,प्रशांत कांबळे |
प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
रुकडी राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी इंग्रजी विभागाचे डॉ. प्रशांत कांबळे यांची निवड करण्यात आली. डॉ. प्रशांत कांबळे गेली सत्तावीस वर्ष या महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे सहा.प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्या माध्यमातून इचलकरंजी परिसरातील बहुतेक सर्व शाळा आणि महाविद्यालयात शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन, नेत्र तपासणी शिबीर, विविध रोग निदान शिबिराचे आयोजन, पल्स पोलिओ निवारण्यासाठी भरीव कार्य, महापुरावेळी गरजूंना जीवनावश्यक साहित्य पुरविणे, कोरोना प्रतिबंध प्रबोधन, सॕनिटायझर व मास्क वाटप, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना सायकल प्रदान, गणवेश व शालेय साहित्य उपलब्ध करून दिले आहे. रोटरीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नेहमीच डॉ. प्रशांत कांबळे मदत करतात. बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा माजी खासदार डॉ. निवेदिता माने सचिव खासदार धैर्यशील माने यांनी त्यांची प्रभारी प्राचार्य म्हणून निवड केली त्यांच्या या निवडीबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्रशासकीय सेवक, आजी-माजी विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा