Breaking

शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण ; मानले मुख्यमंत्र्यांचे आभार




श्री क्षेत्र नृसिंहवाडी


*प्रा.चिदानंद अळोळी ; नृसिंहवाडी प्रतिनिधी*


   कोरोना महामारीची परिस्थिती आवाक्‍यात येत असताना या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी काल ट्विटरवरून नवरात्रीचा पहिल्या दिवसापासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तासाठी खुले करण्याचा  निर्णय काल दि .25 सप्टेंबरला घेण्यात आला.
      श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्तक्षेत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात श्री दत्तात्रयाची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे.पण गेली अनेक महिने मंदिर बंद असल्याने मंदिरावर अवलंबून असलेल्या  व्यापाऱ्यांना  , मिठाई दुकानदाराना, हॉटेल व्यावसायिक ,तसेच पुरोहिताना खूप मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता पण या निर्णयामुळे आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा