Breaking

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

मोजणीसाठी दिले स्वखर्चातून ₹ 3 लाख ; तात्काळ गावठाण विस्तार हद्दवाढीचा विषय हाताळा-नाम.डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर)

 



जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी


        कोथळी गावचा 2005 महापुरापासून गावठाण विस्तार हद्दवाढीचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित होता. यासाठी 1186 या गटातील जागा 227 पूरग्रस्तांना गावठाण विस्तार हद्द वाढीसाठी देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी लगतील शेतकऱ्याने अतिक्रमण केले असून या जागेची मोजणी करून अतिक्रमण काढण्याचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून  रेंगाळत होता. मोजणी चा खर्च कोण उचलायचा याबाबत पेच निर्माण झाला होता. सन 2005,2006, 2019 व 2021 असे चार वेळा महापुराच्या फटका अनेक पूरग्रस्तांना बसला. मात्र आपल्याला गावठाण विस्तार हद्दवाडीमध्ये नाव असून सुद्धा जागा मिळत नसल्याने अनेक ठिकाणी लोक प्रशासकीय यंत्रणेवर नाराज होते.



          मात्र आज नाम. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक जयसिंगपूर येथे पार पडली. यावेळी मोजणीसाठी येणारा तीन लाख इतकी रक्कम स्वखर्चातून देण्याची नाम. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी तयारी दर्शविली. दरम्यान मोजणी नंतर सीमा रेषा अंतिम करून आणखी काही अडचण आल्यास नक्की कळवा. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर मोजणी करून 227   पॉल्ट धारकांना प्लॉट देण्यात यावे असे सांगितले. काही अडचणी आल्या तर त्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ सोडून गावठाण विस्तार हद्दवाडीतील नागरिकांना लवकरच जागा देण्यात येईल असे आश्वासन यावेळी नामदार पाटील यांनी दिले. 

       सदरची बैठक शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळ अध्यक्ष संजय नांदणे यांनी आयोजित करून पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल पूरग्रस्तांना कडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

     यावेळी तहसीलदार डॉ.अपर्णा मोरे धुमाळ, नायब तहसीलदार संजय काटकर, बी.डी.ओ. शंकरराव कवितके,भुमी अभिलेख माळवदे मॅडम, सर्कल संजय सुतार, सरपंच वृषभ पाटील , ग्रामविकास अधिकारी सी.एम. केंबळे,  तलाठी माळी, सतीश मलमे, ग्रा. प. सदस्य नितीन वायदंडे, शरद कांबळे, विलास कोरवी, विनोद कांबळे, उत्तम तिवडे, पोपट कांबळे यासह गावठाण विस्तार हद्दवाडीतील कोथळी गावचे ग्रामस्थ आदी मंडळी उपस्थित होते.

     गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला गावठाण विस्तार हद्दवाढीचा विषय मोजणीसाठी रखडला होता. या मोजणी ची रक्कम ग्रामपंचायत मध्ये कोणतीही तरतूद नसल्याने खर्च करता येत नव्हते.यासाठी नाम. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी 3 लाख स्वखर्चातून दिल्याबद्दल कोथळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा