![]() |
मनसे पदाधिकारी मुख्याधिकार्यांना निवेदन देताना |
गणेश कुरले : विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिकांना व लहान मुलांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या काही घटना घडल्या आहेत,तसेच पहाटे व सायंकाळी फिरायला जाणारे जेष्ठ नागरिक, महिला व अंगणात खेळणारे लहान मुलांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे,मात्र या बाबींकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित करावा असे निवेदन मनसे जयसिंगपूर शहराध्यक्ष लखन भिसे यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर नगरपालिका मुख्याधिकारी श्रीमती टिना गवळी यांना देण्यात आले.
येत्या चार दिवसात कडक अंमलबजावणी न झाल्यास ही भटकी कुत्री कुठलीही पूर्व सूचना न देता पालिका प्रशासन अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या दालनात आणून सोडून मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे,जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष सचिन चकोते,उपाध्यक्ष अमित पाटील,उपाध्यक्ष राजेश कर्णाळे,माजी तालुकाध्यक्ष कुबेर मगदूम,सहकार सेनेचे शहराध्यक्ष महेश पोरे,सोशल मीडिया शहरध्यक्ष अवधूत तांदळे,वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष किरण चव्हाण,धरणगुत्ती सो. मीडिया अध्यक्ष रोहित जाधव आदी महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर घटना सातत्याने घडत असून जबाबदार व्यक्तीकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे हे देखील गोष्ट गांभीर्याने लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळे मनसे जयसिंगपूर शाखेच्यावतीने ही बाब गंभीरपणे लक्षात घेतली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा