![]() |
दानोळी प्राथमिक आरोग्य केंद्र |
शिरोळ तालुका प्रतिनिधी - रोहित जाधव
दानोळी (ता.शिरोळ)येथे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून दानोळी गाव 100% कोरोना मुक्त व्हावे या उद्देशाने आज संपूर्ण गावात एकूण सहा ठिकाणी लसीकरण सत्र सुरू करण्यात आले.
लसीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,येथील ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या विशेष प्रयत्नातून 'एक पाऊल कोरोना मुक्तीकडे' या उद्देशाने गावातील नागरिकांसाठी ५००० लस उपलब्ध करण्यात आली होती, यावेळी सर्वात मोठे कोरोना लसीकरण शिबिर हे सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत घेण्यात आले.
यावेळी गावातील सहा वॉर्डांमध्ये सहा ठिकाणी लस देण्याची सोय करण्यात आली होती.यावेळी 12 डॉक्टर्स, 6 आरोग्य सेविका, 6 आरोग्य सेवक, 4 मदतनीस, 20 अशा स्टाफ, 12 गट प्रवर्तक, हायस्कूलचे 25 शिक्षक व जिल्हापरिषद शाळेचे 35 शिक्षक अशे एकूण 120 लोक या लसीकरण साठी काम करत आहेत. तर रजिस्ट्रेशन जलद गतीने होण्यासाठी सहा ठिकाणी पंधरा कम्प्युटरची सोय करण्यात आली होती.
दानोळी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीने केलेले काम हे गावकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे अशा प्रकारची चर्चा दानोळी गावात व परिसरात होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा