![]() |
मा.सदाशिव आंबी |
*प्रा.चिदानंद अळोळी ; नृसिंहवाडी प्रतिनिधी*
गणेशवाडी : व्यक्तीने ठरवलं तर अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवता येते. असंच काहीसं सदाशिव आंबी व्यवसायाने नावाडी असलेल्या या गणेशवाडी सारख्या ग्रामीण भागातील या व्यक्तीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पदवी वयाच्या 52 व्या वर्षी संपादित करून तरुणाई समोर एक आदर्श ठेवला.
आपल्या सर्वांना माहीत आहे की, शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असून प्रत्येक व्यक्ती आपल्या जन्मापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत तो विद्यार्थीच असतो. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते व नावाडी श्री सदाशिव आंबी याच्याकडे पाहिल्यावर समजते.
सदाशिव आंबी नामक हे ग्रहस्थ नावाडी असून नदीपलीकडे सर्व गावांना परिचित आहेत . 2005,2006, 2019 व 2021 चा महाप्रलयकारी महापूर असो आपल्या नावेने ते हजारों लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याचे काम त्यांनी केले आहे .तसेच विविध सामाजिक कामात नेहमी त्याचा खारीचा वाटा असतो . शिकण्याची जिद्द व चिकाटी च्या आधारावर 52 वर्षाच्या सदाशिव आंबी यांनी तब्बल 30 वर्षांनंतरच्या कालखंडानंतर नावेत बसूनच अभ्यास पूर्ण केला व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून पदवी संपन्न केली .
यामुळेच डाॅ जे जे मगदूम शिक्षण संस्था जयसिंगपुर मार्फत त्याचा सन्मान व सत्कार करण्यात आला व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
आज शिक्षण न घेणाऱ्या व मध्येच शिक्षण सोडून जाणाऱ्या वंचित घटकांना सदाशिव आंबी हे आदर्श ठरणार आहेत. समाजाच्या अखंड सेवेचे फक्त घेऊन पदवीचे शिक्षण प्राप्त केल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा