Breaking

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

जयसिंगपूरच्या डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीरिंगमध्ये एन.एस.एस.डे उत्साहात संपन्न

 

वृक्षारोपण करताना


गणेश कुरले  :  विशेष प्रतिनिधी


  जयसिंगपूर  :आज दि.24 सप्टेंबर,  2021 रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे औचित्य साधून डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगने राष्ट्रीय सेवा योजना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.     

        महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये प्रथम सत्रात रचनात्मक कार्यक्रमाचा भाग म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर, डॉ. एस. एस.आडमुठे,महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या,डॉ.सौ.एस.बी.पाटील, डीन स्टुडंट्स प्रा.पी.पी.पाटील, एन.एस. एस.चे कार्यक्रमाधिकारी प्रा. पी.ए. चौगुले, एन.एस.एस.चे उप- कार्यक्रमअधिकारी प्रा.आर.डी.माने तसेच महाविद्यालयाचे डिन्स, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी हजर होते. 

      त्यानंतर दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांना वैचारिक शिदोरी देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आला करण्यात आले.

   जयसिंगपूर कॉलेजचे प्रा.डॉ.प्रभाकर माने हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते.डॉ. माने मार्गदर्शन करताना म्हणाले, राष्ट्रीय चारित्र्य व संस्कारक्षम नागरिक बनवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची कास धरणे काळाची गरज आहे त्याचबरोबर संवेदनशील व्यक्ती म्हणून निस्वार्थी भावनेने परंतु सेवाभावी वृत्तीने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करणे आवश्यक आहे. या साठी सर्वांनी या दिनाचे औचित्य साधून सेवाभाव हा धर्म मानून आपलं कार्य अविरतपणे चालू ठेवलं पाहिजे. तरच देशाला मानवी विकास निर्देशांकात अव्वल स्थानी जाण्याची संधी मिळेल यासाठी आपण कटिबद्ध असणे गरजेचे आहे.

   कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.ए.चौगुले यांनी कार्यक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक करताना कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर मा.डॉ.आडमुठे व कॉलेजच्या प्राचार्या डॉ.एस.बी.पाटील व डीन स्टुडन्टस प्रा. पी.पी.पाटील या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना एन.एस.एस.डे च्या शुभेच्छा दिल्या.

          या कार्यक्रमाचे उत्तम व नेटकं सूत्रसंचालन एन.एस.एस.ची स्वयंसेविका कु.शिवानी अंबरगे यांनी केले.एन.एस.एसचे उप-कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.डी.माने यांनी सर्व उपस्थित असणाऱ्या मान्यवर व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे मनस्वी आभार व्यक्त केले.

  या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील एन.एस.एस. स्वयंसेवक व स्वयंसेविका अभिषेक भंडारे, रोहित पुजारी, श्वेता कारंडे, प्राची कोथळे, स्नेहल पाटील, निखिल राजमाने इत्यादी हजर होते.

       या उत्तम कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा