![]() |
कै.विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगर |
ओंकार पाटील : शिरोळ प्रतिनिधी
विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ या संस्थेचा काल २४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कु.क्षितिजा चव्हाण,कु.अश्विनी कांबळे,कु.सानिका रजपूत त्याचबरोबर विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या यशवंतांचा सन्मान सोहळा पार पडला.
दैनिक महान कार्याचे प्रतिनिधी मा.अरुण बावचे यांचा उत्कृष्ठ पत्रकार म्हणून गौरव करण्यात आला. त्याचबरोबर देवस्थान समितिचे अध्यक्ष मा.श्री.दौलू रामा भोगुलकर यांचा समाज भूषण पुरस्कार, मा. हैदरली अली जुबेर शेख यांना समाजरत्न पुरस्कार गौरव करण्यात आला.तसेच मा.शंकर चव्हाण यांना कृषीरत्न आणि मा.धनाजी चुडमुंगे ( अंकुश आंदोलन कार्यकर्ते ) यांना उद्योगरत्न पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात आपल्या जीवाची बाजी लावून सेवा बजावलेल्या आशा वर्कर्स यांचाही सम्मानपत्र देवून आरोग्य सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमूख पाहूणे म्हणून लाभलेले मा.श्री. विनायकजी भोसले (विश्वस्त,संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे कोल्हापूर ) यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.शहाजीराव दाभाडे सो , संस्थेचे सचिव मा.श्री. मेजर के.एम्. भोसले सो तसेच खजिनदार मा. कृष्णात पाटील , संचालक व सरपंच मा.अमोल चव्हाण सो, तंटामुक्ती अध्यक्ष व संचालक मा.श्री. सुरेश दादा पाटील सो , संचालक मा.श्री . संग्रामसिंह देसाई, संचालक मा.श्री. भगवानराव कांबळे,एल.आय,सी. अधिकारी व संचालक मा.अमित जाधवसंचालक व उद्योजक मा.अरुण पोटे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. खंडेराव जगदाळे सर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे सचिव मा. मेजर के.एम.भोसले यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका सौ. कांबळे मॅडम यांनी केले. तर सुत्रसंचालन विदयालयाचे सहाय्यक शिक्षक मा.श्री. नितिन बागुल सरांनी केले.
शेवटी राष्ट्रगीताने कार्यकमाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा