Breaking

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली परवानगी ; ४ ऑक्टोंबर पासून होणार शाळा सुरू...


४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा  होणार सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली शाळा सुरू करण्याची परवानगी 

शाळा सुरुवातीला ऐच्छिक स्वरुपात सुरू असतील


संग्रहित


       राज्यातील शाळा ४ ऑक्टोंबर पासून प्रत्यक्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. कोविड स्थिती काहीशी निवळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नेमके कोणते वर्ग सुरू होणार हे याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. या वृत्ताला शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही दुजोरा दिला आहे. सर्व कोविड नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

 

     दुसरीकडे, राज्यातील महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू झालेली नसताना शाळा मात्र आधी सुरू होत असल्याबाबत काही पालक संघटनांनी चिंताही व्यक्त केली आहे.

       दरम्यान, शाळा प्रत्यक्ष सुरू होणार असल्या तरी त्या सुरुवातीला ऐच्छिक स्वरुपात असतील, असेही कडू यांनी सांगितले. कोविड नियमांचे पालन कसे करायचे, शिक्षकांचे लसीकरण आदींसंदर्भात येत्या दोन दिवसांत सविस्तर भूमिका जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा